5 Mar 2026, Thu

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांच्या तर्फे



राष्ट्रधर्मपूजक – दादाराव कराड स्मृती
राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा- २०२६

पुणे, दि. ४ मार्च: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक-दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी होणार आहे. स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास रोख रूपये १,२५,०००/- चांदीची गदा, मेडल व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कुस्ती खेळाडूसह क्रीडा प्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. महेश थोरवे आणि क्रीडा विभागाचे संचालक डाॅ. वैभव वाघ, महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धेचे सचिव प्रा. विलास कथुरे उपस्थित होते.
 माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तसेच, पारितोषिक वितरण समारंभ याच दिवशी सायं. ७ वा. होणार आहे.
 समारंभास ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि अर्जुन अवॉर्डी पै. नरसिंग यादव प्रमुख पाहुणे तसेच, हिंद केसरी पै. जगदीश कालीरमण हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र श्री पै. विजय उर्फ विकी बनकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामेश्वर (रुई)चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा होणार आहे.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे १९वे वर्ष आहे. यासाठी महाराष्ट्रातील नामवंतासह देशभरातील मल्लांना निमंत्रीत केले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील महावीर केसरी गटातील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी हा अत्यंत बहुमानाचा किताब, रोख रूपये १,२५,०००/- चांदीची गदा व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकास रोख रूपये १,००,०००/-, तृतीय क्रमांक ५० हजार आणि चतुर्थ क्रमांकास २५ हजार रूपये यासह वजनगट ५७, ६१, ६५, ७०, ७४,८६ आणि  ८६ प्लस ते १२५ किलो वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय हजारो रूपयांची पारितोषिके, सुवर्ण, रौप्य, कास्यं पदक, मेडल, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व कुस्तीगीरांना मानधन देण्यात येईल.
थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्य शास्त्रातील एक महान चमत्कार, योग महर्षि शतायुषी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरूस्त अशा पंच्चाहत्तर वर्षे वयाच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळी वेगळी कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना योग महर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा स्मृती सुवर्ण, रौप्य, कांस्य गौरव पदक बहाल करण्यात येईल.
 सर्व मल्लांची वजने सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी सायं. ४ ते ८ पर्यंत घेतली जातील. सर्व कुस्तीगीरांनी आधारकार्डची मूळ प्रत व त्याची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे. स्पर्धा राज्य संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. स्पर्धेसाठी येणार्‍या सर्व कुस्तीगीरांच्या जाण्या-येण्याचे एस.टी.भाडे, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा.विलास कथुरे (मो.नं.९८५०२११४०४), पै. राहुल बिराजदार (मो.नं.८००७५९३४३४), मो.नं. ७२७६३३७६७०/९८८११०१६३०  यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे. त्याच बरोबर क्रीडाप्रेमींनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.

   
जनसंपर्क  विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button