3 Mar 2026, Tue

 पुण्यात रेल्वेकडून मोठी अपडेट, चारपैकी दोन केंद्रं बंद; तिकीट काढण्यासाठी आता….

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून प्रवाशांना रेल्वेचे तिकीट काढणे सोईचे व्हावे म्हणून शहराच्या वेगवेगळ्या भागांत सुरू केलेल्या आरक्षण केंद्रांना ऑनलाइन तिकीट सुविधेमुळे खूपच कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी तिकीट जाऊन काढणाऱ्यांची संख्या खूपच घटली आहे. त्यामुळे रेल्वेने लष्कर आणि रविवार पेठ येथील आरक्षण उपकेंद्र बंद केली आहेत, तर, डेक्कन आणि शंकरशेठ रस्त्यावरील उपकेंद्र प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू ठेवली आहेत.

चार ठिकाणी होती आरक्षण उपकेंद्रे

डेक्कन जिमखाना आणि शंकरशेठ रोड येथील उपकेंद्रांत 2023-24 आणि 2024-25 मध्ये नोव्हेंबरपर्यंत तुलनात्मक आढावा केला असता, तिकीट विक्री आणि प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. शंकरशेठ रस्ता येथील उपकेंद्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत 22 हजार 250 तिकिटे कमी काढण्यात आली आहेत, तर डेक्कन जिमखाना उपकेंद्रात 44 हजार 394 तिकिटे काढण्यात आली असून, प्रवाशांमध्ये 88 हजारांची घट नोंदवण्यात आली आहे.

प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

खासगी ऑनलाइन ॲपवरदेखील रेल्वेचे तिकीट काढण्याची सोय झाली आहे. त्यामुळे या आरक्षण उपकेंद्राला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. डेक्कन जिमखाना आणि शंकरशेठ रस्ता या दोन केंद्रांवर प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला असला, तरी त्या ठिकाणी तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण अद्यापही बरे आहे. त्यामुळे ही केंद्रे सुरू ठेवली आहेत.

डेक्कन जिमखाना आणि शंकरशेठ रोड येथील उपकेंद्रांत 2023-24 आणि 2024-25 मध्ये नोव्हेंबरपर्यंत तुलनात्मक आढावा केला असता, तिकीट विक्री आणि प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. शंकरशेठ रस्ता येथील उपकेंद्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत 22 हजार 250 तिकिटे कमी काढण्यात आली आहेत, तर डेक्कन जिमखाना उपकेंद्रात 44 हजार 394 तिकिटे काढण्यात आली असून, प्रवाशांमध्ये 88 हजारांची घट नोंदवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button