
पुणे,19 जानेवारी 2026 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंट (आयआयएमएम) पुणे शाखेतर्फे दहावा वार्षिक सप्लाय चेन मॅनेजमेंट पुरस्कार सोहळा नुकताच हॉटेल पंचरत्न येथे संपन्न झाला.याशिवाय आयआयएमएम पुणे शाखेला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा सोहळा खास ठरला.
वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये उत्पादन व लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) चे संस्थापक श्री.हणमंतराव गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट पब्लिक मोबिलिटी ॲवॉर्ड हा महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.ला तसेच सर्वोत्कृष्ट सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणून भारत इलेक्ट्रॉनिक्सला प्रदान करण्यात आला.जॉन डिअर कंपनीच्या समीरा शेख यांना सप्लाय चेन क्षेत्रात महिलांच्या योगदानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुणे रिव्हर रिव्हायवल आणि माणदेशी फाऊंडेशन यांना अनसंग हिरो पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच उत्पादन क्षेत्रात मोठ्या उद्योग गटात कल्याणी मॅक्सीकॉन व्हील्स प्रा.लि., रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या उद्योग गटात कोहिनूर ग्रुप,मध्यम उद्योग गटात लिगसी लाईफस्पेसेस एलएलपी यांना सर्वोत्कृष्ट सप्लाय चेन पध्दतींसाठी पुरस्कार देण्यात आला.ॲटलांटिक रोड सर्व्हिसेस प्रा.लि.ला (लघु) आणि ट्रान्सीक्युर लॉजिस्टिक (मध्यम) ला सर्वोत्कृष्ट रोड सर्व्हिस प्रोव्हाईडर पुरस्कार देण्यात आला.आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा संस्था म्हणून पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे व ॲम्फिनॉल इंटरकनेक्ट इंडिया प्रा.लि.चे संचालक व कार्यकारी अधिकारी रॉबर्ट जॉन म्हणाले की,सप्लाय चेन मॅनेजमेंट हे क्षेत्र भारताच्या आर्थिक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रात गेल्या दशकात आमुलाग्र परिवर्तन घडले आहे.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंची अखंड वाहतूक व वितरण करण्यात तसेच व्यवसायांना कार्यक्षमतेने चालण्यास आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास लॉजिस्टिक्स क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आयआयएमएम पुणेचे अध्यक्ष सुहास गवस म्हणाले की,कार्यात्मक सहाय्य असण्यापासून ते व्यवसाय सातत्य,शाश्वतता आणि राष्ट्रीय विकासाचे धोरणात्मक प्रणेते बनण्यापर्यंत पुरवठा साखळी व्यवस्थापनाची भूमिका मूलभूतपणे पुन्हा परिभाषित झाली आहे.आजचे पुरवठा साखळी नेतृत्व केवळ या क्षेत्रात असलेल्या आव्हानांना पेलत नाही तर डिजिटलायझेशन,जबाबदारपणे संसाधनांचा वापर आणि सहयोगी परिसंस्थेद्वारे भविष्याला आकारही देत आहेत.मजबूत पुरवठा साखळ्या या अर्थव्यवस्थेचा कणा असतात.
कार्यक्रमाची सुरूवात आयआयएमएम पुणेच्या 60 वर्षाच्या प्रवासावर आधारित एका माहितीपटाने झाली आणि त्याचबरोबर सुरेश नाईक,विजय कियावत,प्रदीप नाडकर्णी,प्रवीण संपत,डी.डी.वांजळे,मोहन नायर व विजय लघाटे या माजी अध्यक्षांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात आयआयएमएमच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयआयएमएम पुणेचे माजी अध्यक्ष मोहन नायर तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक के.आर.नायर यांनी केले.
या कार्यक्रमाला श्रीकृष्ण पॅकेजिंग इंडस्ट्री हे इव्हेंट स्पॉन्सर,भन्साली मेटालॉईज,जय ज्योती स्टील,जैनेक्स इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन,एनप्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. हे गोल्ड स्पॉन्सर्स ,सेच्युंरी एंका लि.,ॲरोवाईज एनर्जी प्रा.लि.,माईलेज लॉजिस्टिक्स प्रा.लि.हे सिलव्हर स्पॉन्सर्स तर चॅम्पियन स्टील्स,यशवंत इंजिनिअरिंग ,सिटी वेअर हाऊसिंग ॲन्ड लॉजिस्टिक प्रा.लि.,ईस्क्वायर हेल्थकेअर ॲन्ड लॉजिस्टिक प्रा.लि.हे ब्राँझ स्पॉन्सर्स होते.
